[cq_vc_coverslider images=”1241,1242,1244,1254,1253,1251,1246″ delaytime=”7″ navstyle=”sunflower” buttonsize=”btn-small” navposition=”float-right” isshadow=”longshadow”][captionitem]रेऊ वाणी विज्ञान विहार प्रकल्पाच्या बोटॅनिकल गार्डन उद्घाटन प्रसंगी[/captionitem] [captionitem]बोटॅनिकल गार्डन उद्घाटन प्रसंगी दीपप्रज्वलन करतांना सचिव प्रा.डॉ. शोभा शिंदे व उपस्थित मान्यवर[/captionitem] [captionitem]डॉ. विवेक पाटकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना[/captionitem] [captionitem]वर्षभरात घेण्यात येणार्‍या स्पर्धेतील बक्षीस पात्र विद्यार्थी[/captionitem] [captionitem]कार्यशाळेत बनविलेले शाडू मातीचे गणपती[/captionitem] [captionitem]विज्ञान सप्ताह उद्घाटन समारंभ[/captionitem] [captionitem]रयोग करतांना विद्यार्थी[/captionitem][/cq_vc_coverslider]

मराठी विज्ञान परिषद आणि मराठी विज्ञान महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर 1994 मध्ये धुळे येथे 29 वे अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलन आयोजित करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान जिज्ञासा निर्माण करण्यासाठी एक प्रयोग मेळाव्याचाही त्यात समावेश होता. मेळाव्याला सुमारे 900 विद्यार्थ्यांची उपस्थिती गृहीत होती मेळाव्यासाठी येणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना मेळाव्यात मांडलेले विविध प्रयोग स्वत:च्या हातांनी करता येतील अशी मूळ योजना होती. परंतु मेळाव्यासाठी प्रत्यक्षात लोंढेच्या लोंढे आले. हजारोंच्या संख्येने आलेल्या या विद्यार्थ्यांना स्वत:च्या हाताने प्रयोग करण्याची संधी देणे अर्थातच शक्य नव्हते. मेळाव्यात मांडलेल्या प्रयोगाचे नुसते दर्शन घेऊनच या सर्व विद्यार्थ्यांना परतावे लागले. संयोजकांची आणि विद्यार्थ्यांचीही घोर निराशा झाली.
धुळे शहरातील शालेय विद्यार्थी विज्ञानाच्या प्रात्यक्षिकांसाठी किती उत्सूक आहेत याची प्रचिती वरील प्रसंगातून जाणवली. त्यासोबत दुसरा एकविचार डोकावला; शहरातील विद्यार्थ्यांची जर ही स्थिती तर मग ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांची विज्ञानाची भूक कशी भागत असणार? धुळे शहरात आणि धुळे शहरालगतच्या अनेक माध्यमिक शाळांतून जागा आणि साधनांचा अभाव यातून ही परिस्थिती निर्माण झाली आहे ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन ‘रेऊ वाणी विज्ञान विहार’ चा प्रकल्प हाती घेण्यात आला. 1 मार्च 1997 रोजी उत्तर महाराष्ट्रात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एस. एफ. पाटील यांच्या हस्ते ‘रेऊ वाणी विज्ञान  विहार’ चे औपचारिक  उद्घाटन करण्यात आले.
 का. स. वाणी स्मृती प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. मधुकर देशपांडे आणि त्यांच्या पत्नी पुष्पा देशपांडे यांनी ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या विज्ञान वाहिनी या फिरत्या विज्ञान शाळेच्या अनुभवाचाही या प्रकल्पाला खूप फायदा झाला. विज्ञान विहाराची कल्पना बर्‍याच अंशी फिरत्या विज्ञान शाळेच्या धर्तीची आहे. शहरी  व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांतील विविध प्रयोग स्वत:च्या हातांनी करण्याची संधी उपलब्ध करून देणे ही ती मूळ कल्पना. परंतु फिरत्या विज्ञान शाळेत बर्‍याचशा गोष्टी साध्य होऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ वनस्पतीशास्त्र उद्यान, वनस्पतीशास्त्र शिकवितांना विद्यार्थ्यांना निरनिराळ्या वनस्पती प्रत्यक्ष दाखविल्याने वनस्पतीचे वर्गीकरण कायम स्वरूपी लक्षात राहते व ज्ञानात मोलाची भर पडते. यासाठी विज्ञान विहारच्या प्रकल्पात वनस्पतीशास्त्र उद्यानाचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील अशा वनस्पती आणि वृक्षांची लागवड या उद्यानात करण्यात आली आहे. निरनिराळ्या शाळांतील विद्यार्थ्यांना या वनस्पतींच्या निरीक्षणाची संधी या उद्यानाद्वारे उपलब्ध झाली आहे.
 उद्यानाव्यतिरिक्त पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्राच्या प्रात्यक्षिक ज्ञानासाठी एक प्रयोगशाळाही तयार करण्यात आली. निरनिराळे प्रयोग स्वत: करून त्या त्या प्रयोगांचे निष्कर्ष नोंदविण्याची संधी या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येते. पूर्वी एकूण 25 टेबलांवर 50 प्रयोगांची मांडणी प्रयोगशाळेत केलेली असायची. शाळेतील शिक्षक आणि दोन मदतनीसांच्या देखरेखीखाली सुमारे 50 विद्यार्थी या प्रयोगांची प्रात्यक्षिके करत. प्रयोगाबरोबर रात्रीच्या वेळी आकाशातील ग्रह आणि तारे बघता यावे यासाठी अद्ययावत दुर्बिण घेण्यात आली.