डॉ. जगन्नाथ काशिनाथ वाणी

सन्माननीय सेवानिवृत्त प्राध्यापक (संख्याशास्त्र)

(जन्म: १० सप्टेंबर १९३४  | मृत्यू : ६ मे २०१७)

एम्.एस्सी., पीएच.डी.
कॅलगरी विद्यापीठ, कॅलगरी, कॅनडा
सन्माननीय सेवानिवृत्त प्राध्यापक (संख्याशास्त्र),
ग्रंथ प्रकाशन:
  • Probability and Statistical Inference Appleton Century-Crofts, New York (1971), 315 pages.
  • अंधारातील प्रकाशवाटा – दुसरी आवृत्ती, कॉन्टिनेन्टल प्रकाशन (2009), 300 पाने.
  • Triumphs and Tragedies K.S. Wani Memorial Trust (2011), 300 pages.
  • Living Rooms to Concert Halls – Raga-Mala Journey: 1975 -2004, (2004), 60 pages.
  • बिनघडीचा डाव, का. स. वाणी स्मृती प्रतिष्ठान, पृ.189.
  • An Unarranged Life, K.S.Wani Memorial Trust, 184 pages.
जनजागृतीसाठी चित्रपट निर्मिती 

(महाराष्ट्र सेवा समितीच्या जनजागृती प्रकल्पांसाठी):

  • ‘देवराई’ (स्क्रिझोफ्रेनियाविषयी जनजागृती – भारताच्या राष्ट्रपतींकडून रजत पदकासह वेगवेगळे 16 पुरस्कार).
  • ‘एक कप च्या’ (माहितीच्या अधिकाराबद्दल जनजागृती) (झी मराठी, महाराष्ट्र सरकार यांचेकडून उत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरविला गेला.)
  • डॉक्टर, बाळ बोलत नाही ! (मुक-बधिर मुलांच्या संगोपनासंदर्भात जनजागृती)

  माहितीपर लघुपट (महाराष्ट्र सेवा समितीच्या कार्यवाढीसाठी):

  • अरण्यातील प्रकाशवाटा व Divine Messengers – डॉ. प्रकाश व सौ. डॉ. मंदा आमटे यांच्या समाजकार्यावर आधारित.
  • गगनाला पंख नवे व When Aspirations Transcend the Sky – नसीमा हुरजूक व त्यांच्या कार्यावर आधारित.
  • गौतमच्या आईची शाळा व School That Gautam’s Mother Built. – मतिमंदांच्या पुनर्वसनासाठी.
  • Three Faces of Tomorrow – महाराष्ट्र सेवा समितीचे तीन पुनर्वसन प्रकल्प.
  • Dai – A Tribal Midwife -आदिवासी दाई प्रशिक्षण.
  • The people, … by the people – पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण.
  • आपणच आपल्यासाठी व Dawn of Hope – नीलिमा मिश्रा यांचे ग्रामविकास कार्य.
  • Bridging Miles and Minds – रौप्यमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र सेवा समितीच्या कार्याचे संक्षिप्त वृत्तांकन.
  • Passion with Compassion – दुर्बलाच्या न्यायासाठी लढा – सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांच्या कार्यावर आधारित.
  • Vision is our Mission  व दृष्टीदान – धर्मार्थ डोळ्यांचे हॉस्पिटल.
  • Possibilities Unlimited  व शुध्द बीजापोटी … – रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने का. स. वाणी स्मृती प्रतिष्ठानच्या कार्याचे अवलोकन.
विशेष उल्लेखनीय पुरस्कार:
  • सेवा पुरस्कार (1979) – अल्बर्टा कल्चर, अल्बर्टा सरकार.
  • उल्लेखनीय सेवा पुरस्कार (1985) – इंडिया-कॅनडा असोसिएशन ऑफ कॅलगरी.
  • कुसुमाग्रजांच्या हस्ते विशेष गौरव (1987) – अनुष्टुभ प्रतिष्ठान.
  • सन्माननीय आजीव सभासदत्व (1993) – स्क्रिझोफ्रेनिया सोसायटी ऑफ अल्बर्टा.
  • भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते उल्लेखनीय सेवा गौरव (1994) – जागतिक मराठी परिषद.

1994 साली मुंबई येथे भरलेल्या तिसर्‍या जागतिक मराठी परिषदेत   डॉ. जगन्नाथ वाणी यांना भारताचे राष्ट्रपती डॉ. शंकरदयाल शर्मा यांच्याहस्ते उत्कृष्ट समाजसेवेबद्दलचा पुरस्कार प्रदान.

1989 जागतिक मराठी परिषदेची स्थापना जागतिक पातळीवर मराठी भाषिकांना एकत्र आणावे. मराठी भाषा संस्कृती यांची जपणूक करून ती वृद्धिंगत करावी. उद्योगव्यवसायात मराठी माणसाने प्रगती साधण्याकरिता त्याला उद्युक्त करावे. विचारांची देवाणघेवाण घ्यावी अशा उद्देशाने जागतिक मराठी परिषदेची स्थापना झाली. संस्थापक श्री. शरद पवार, श्री. मनोहर जोशी, श्री. भा. कृ. देसाई व श्री. माधव गडकरी आहेत.

  • प्रमुख पाहुणे (2004) – इंडियन सकायट्रीक सोसायटी (पश्चिम विभाग), 35 वे वार्षिक अधिवेशन.
  • आंतरराष्ट्रीय शांतता पदक (2004) – वाय्. एम्. सी. ए. कॅलगरी.
  • जीवन गौरव पुरस्कार (2011) – बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका.
  • ऑर्डर ऑफ कॅनडा (2013) – गव्हर्नर जनरल, कॅनडा.