ग्रामीण भागातील मुलांची नेत्र सुरक्षा

 

Blindness Prevertion Among Rural Children in Dhule District .
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगात 1.4 मिलियन मुले ही अंध आहेत. त्यात प्रामुख्याने विकसनशील देशात यांची संख्या जास्त आहे. डॉ. परिक्षित गोगटे यांचा संशोधनपर लेख ‘British Journal of opthalmogy’ सन 2007  मध्ये प्रकाशित झाला होता. त्यांच्या संशोधनानुसार मुलांमध्ये  असणारे दृष्टिदोष कमी करणे शक्य आहे. जर तो वेळेत लक्षात आला व योग्य पद्धतीने उपचार केलेत, तर निश्चित लाभ होतो.
प्रायोगिक तत्त्वावर 2008 मध्ये धुळे शहरात केलेल्या तपासणीत जवळपास 30% मुलांमध्ये दृष्टिदोष आढळून आलेत. आणि ग्रामीण भागात तर यापेक्षाही वाईट स्थिती होती. यातूनच वरील प्रकल्प सुरू करण्याची निकड अध्यक्ष डॉ. जगन्नाथ वाणी यांच्या लक्षात आली आणि हा प्रकल्प MSSO व CIDA च्या आर्थिक सहकार्यातून राबविण्याचे ठरले.

 

प्रामुख्याने या प्रकल्पाची उद्दिष्टे

 
  • ग्रामीण मुलांमध्ये दृष्टिदोष व त्याची निगा याबद्दल जागरूकता निर्माण करणे.
  • धुळे जिल्ह्यातील मुलांना डोळे तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे.
  • दृष्टिदोष असलेल्या मुलांना उपचार उपलब्ध करून देणे.
  • शाळाबाह्य मुलींना शोधून, तपासणी व उपचार उपलब्ध करून देणे.