शारदा नेत्रालय हे नेत्र सेवेच्या माध्यमातून गेली 15 वर्षे रुग्णांना उपचार देत आहे. सन 2005 मध्ये का. स. वाणी स्मृति प्रतिष्ठान आणि संदीप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा नेत्रालयाची स्थापना झाली. शारदा नेत्रालय आपल्या रूग्णांना अविरत दिलेल्या सेवेसाठी ओळखले जाते. शारदा नेत्रालय हे 24 बेडचे हॉस्पिटल आहे. शारदा नेत्रालय येथे डोळ्यांच्या आजाराच्या निदान व उपचारासाठी अत्याधुनिक मशीन उपलब्ध आहेत. डोळ्यांच्या  आजाराचे निदान व उपचारासाठी अत्याधुनिक मशीन उपलब्ध आहेत. डोळ्यांच्या विविध आजारांसाठी जसे कि मोतीबिंदू, रेटिना (नेत्रपटल) विकाराच्या उपचार व शस्त्रक्रियेसाठी पूर्णवेळ तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. सुरुवातीला रेटिना तज्ञ महिन्यातून एकदा भेट देत असत मागील वर्षापासून शारदा नेत्रालयात पूर्ण वेळ रेटिना तज्ञ उपलब्ध आहेत.
तसेच काचबिंदू व लहान मुलांचे दृष्टिदोष तसेच तिरळेपणासाठी मुंबईचे निष्णात डॉक्टर दर महिन्याच्या दुसर्‍या व तिसर्‍या शनिवारी शारदा नेत्रालयात उपलब्ध असतात.
मागील वर्षी शारदा नेत्रालयात मोतीबिुदेचे 7.835 ऑपरेशन करण्यात आले.
कमलिनी वाणी अंतर्गत शारदा नेत्रालय येथे दर महिन्याला 8 मिनी कॅम्प घेतले जात असून साधू वासवानी ट्रस्ट व ऋषभ नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक मेगा कॅम्प घेतला जातो.

 

शारदा नेत्रालयात खालील सोयी पुरविल्या जातात :

 
(1) तपासणीसाठी उपलब्ध सोयी –
 • कॉम्प्युटर तसेच रेटिनोस्कोपी द्वारे डोळ्यांच्या नंबरची अचूक तपासणी.
 • डायरेक्ट व इनडायरेक्ट ऑफथाल्मोस्कोपी.
 • स्लीट लॅम्प (कंपनीचे)
 • अ – स्कॅन जागतिक दर्जाच्या IQL Master 500 ह्या मशीनद्वारे मोतीबिंदूच्या आधीची लेन्सची तपासणी.
 • इ – स्कॅन सोनोग्राफी.
 • YAG  लेसर, अरगॉन, लेसरद्वारा उपचार.
 • पेरीमेट्री (Humphrey Field Analyser) मशीनने काचबिंदूची तपासणी.
 • ओ. सी. टी., फंडस अ‍ॅजिओग्राफी द्वारा डोळ्यांच्या पडद्याच्या तपासणीची सोय.
 • लहान मुलांचा दृष्टिदोष, तिरळेपणा याचे योग्य निदान व उपचार.
 
(2) ऑपरेशन थिएटर –

4 टेबलचे सुसज्ज ऑपरेशन थिएटर असून त्यात खालील मशीन उपलब्ध आहेत-

 • Zeiss Microscope.
 • Vitreactomy Machine.
 • Phacoemulcification Machine.
 
(3) शस्त्रक्रियेच्या सोयी –
 • सर्व प्रकारच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया (एस.आय.सी.एस.,फेको)
 • सर्व प्रकारच्या रेटिना शस्त्रक्रिया.
 • सर्व प्रकारच्या काचबिंदू शस्त्रक्रिया.
 • लहान मुलांचे दृष्टिदोष व तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया.