प्रतिष्ठान व संस्था दोन्हीसाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाचे कोणतेही अनुदान घेतले नाही, ही उल्लेखनीय बाब असून दोन्ही संस्था स्वयंपूर्णपणे कार्यान्वित व्हाव्यात या हेतूने मुद्रणालयाची (मुद्रण शाळेची) सुरुवात झाली.
मुद्रण शिक्षण देणार्‍या बोटावर मोजता येईल इतक्याच दोन ते तीन संस्था महाराष्ट्रात कार्यान्वित असतांना खान्देशातील प्रामुख्याने आदिवासी दुर्गम भागातील ग्रामीण युवकांना सहज रोजगाराच्या (नोकरीच्या) संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची मान्यता घेवून पदविका अभ्यासक्रम 1993 पासून संस्थेतून सुरू करण्यात आला.
मुद्रण क्षेत्राचे बदलते स्वरूप व आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढती मागणी याबरोबरच प्रतिरूप व इतर सर्वच मुद्रण क्षेत्रात रोजगाराभिमुख संधी लक्षात घेता तसेच तंत्रज्ञानातील बदल, संगणकाचा मुद्रण क्षेत्रात होणारा अंतर्भाव या सर्वच बाबी संस्थापक अध्यक्षांनी जवळून पाहिल्या, अभ्यासल्या व आपल्या मातृभूमीतील भूमीपुत्रांना या संधी सहज उपलब्ध व्हाव्यात या हेतूने पदविका अभ्यासक्रम ‘डिप्लोमा इन प्रिंटींग आर्ट’च्या माध्यमातून मुद्रणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण अभ्यासक्रमाची सुरुवात  झाली. भारत सरकारचा स्किल इंडियाचाच एक भाग डॉ. जगन्नाथ वाणी यांच्या दूरदृष्टीतून 1993 साली साकारण्यात आला होता.

 

अभ्यासक्रमाची उद्दिष्टे

 
  • कुशल तंत्रज्ञ निर्मित करून मुद्रण व्यवसायात संधी उपलब्ध करून देणे.
  • तंत्रज्ञानात व संगणक क्षेत्रात सतत होणार्‍या बदलांची विद्यार्थ्यांना ओळख करून देणे.
  • माध्यमांच्या जगात आवश्यक असलेले आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देणे.
  • मुद्रण व्यवसायासाठीची आवश्यक ती सर्व उद्योजकीय कौशल्ये विकसित करणे.
  • मुद्रणाचा व्यावसायिक दर्जा व व्यावहारिक सजगता विकसित करणे.