21 ऑगस्ट 1988 रोजी पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. वि. ग. भिडे यांच्या हस्ते संस्थेचे औपचारिक उद्घाटन होऊन जून 1989 पासून मराठी एम. फिल /पीएच. डी. चे संशोधन वर्ग व कार्य सुरू झाले.
आतापर्यंत 130 विद्यार्थ्यांनी एम. फिल. पदवी प्राप्त केली असून सहा विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी मिळविलेली आहे. काही विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य सुरू आहे. 1989 पासून एम. फिल. च्या वर्गांना पुणे विद्यापीठाची मान्यता होती. 1995-96 पर्यंत एम. फिल. चे नियमित वर्ग सुरू होते. नंतर नेट-सेट परीक्षेच्या सक्तीमुळे विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत. परिणामी वर्ग स्थगित करण्यात आले.
वर्ष 2006-07 यावर्षी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मराठी, हिंदी व इंग्रजी एम. फिल. च्या वर्गांना पुन्हा मान्यता दिली होती. सदर शैक्षणिक वर्षात 42 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन उत्तम प्रतिसाद लाभला. नंतर विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेस स्थगिती दिली. सध्या संस्थेचे संचालक प्रा. डॉ.वंदना महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत 4 विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.